कधी कोणी असं भेटतं आणि आयुष्याशी तात्विक संवाद होतो.....
'अभीयांता' वर्षांकासाठी आमची मराठी विभागाची मंडळी गेली होती-दिलीप प्रभावळकर यांच्याकडे.वेळ दिली होती अर्ध्या तासाची पण गप्पा रंगल्या आणि तब्बल सव्वा तास मुलाखत सुरु होती...
त्यांच्या अभिनय संबंधीच्या मतांने मी प्रचंड प्रभावित झालो.अभिनेत्याने भुमिकेमध्ये शिरायचं वगरे नसतं तर ती भूमिका तीन टप्प्यांमध्ये घडते...एक म्हणजे तुम्ही काय आहात ही जाणीव ..दुसरी तुम्ही ती करीत आहात याची जाणीव..आणि तिसरी म्हणजे प्रेक्षक म्हणून तुम्ही ती बघता ही जाणीव.
"टिपरे ही मालिका मी ऐन उंची वर असतांना बंद केली कारण मला लोकांनी 'ती मालिका बंद का केली ?' हे विचारणं मला त्यांच्या 'ती मालिका कधी बंद करणार?'ह्या विचारण्यपेक्षा जास्त आवडतं..."अश्या गमतीदार शब्दात त्यांनी त्यांचे विचार मांडले...
विजय तेंडूलकर 'हसवा फसवी'चा प्रयोग बघायला आले होते.लेखन स्वतः प्राभावळकरांच होतं.त्यामुळे हे स्वतः जरा बिचकूनच होते,तेंडूलकर जे येणार होते!
प्रयोग संपला आणि तेंडूलकर प्रभावळकरांना म्हणाले 'प्रेक्षक तुमच्या बाजूने आहेत'.
हा माणूस जरा बिनधास वाटला तो वागण्यामुळे नाही, बोलण्यामुळे नाही, कोणत्या हालचालीमुळे नाही तर 'स्वतः'च्या विचारांमुळे...
ह्या माणसाने अभिनय संबंधी एक आत्मीयता माझ्यात निर्माण केली केवळ १ तासांच्या चर्चे मध्ये...जे क्षेत्र आपल्यासाठी नाही असं वाटत होतं ते आपलं क्षेत्र कसा आहे हे मला या माणसाने सांगितलं असं वाटतं.
No comments:
Post a Comment