मी गेल्या चार वर्षात महाविद्यालयाच्या 'अभियंता' ह्या वर्षांकासाठी काम करतांना, इतिहास मंडळाच्या सहली आणि इतर मंडळांच्या माध्यमातून जो प्रवास घडला तो शरीराचाच नाही तर मनाचा ही झाला अहे. ह्या चार वर्षांचा लेखा-जोखा मांडतांना मला स्वतःला ह्या चार वर्षातील 'प्रवास' टाळता येणारच नाही.
'बहुत करावे देशाटन' हे म्हणणे किती 'समर्थ' होते ह्याचा अंदाज चार वर्षात झालेल्या बदलात सामावलंय. पहिल्या वर्षी आल्या-आल्या माझी ज्ञानेश्वर पाटील ह्या वल्लीशी भेट झाली. त्याने राजगडावर इतिहास मंडळाची सहल जात असल्याच सांगितल. किल्ला आणि तो ही दुर्गदुर्गेश्वर राजगड! मी तयार झालो. वर्ग मित्र केदारलापण कल्पना दिली. तो भटकंतीत माझ्याहूनही पटायित. तो येतो म्हणाला. तयारी केली आणि आम्ही महामंडळाची गाडी पकडून राजगड रवाना झालो. ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी, केदार भिडे,सुमित चिंचणे, ऋचा जोग आणि जयति आठल्ये असे श्री. निनाद बेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पावसाळी सहल सुरु झाली. चढण सोप होत पण वर गेल्या वर प्रचंड धुकं आणि पाउस! आमचा मुक्काम पद्मावती माचीवर होता. रात्री बेडेकरांच्या किस्स्या-कथांमध्ये रममाण होऊन आम्ही पायथ्यावरच्या गावकर्यांनी आणलेल सुंदर पिठलं-भाकरीच जेवण केलं. खोलीच्या आत वरून टीप-टीप पडणारा पाउस, बाहेर मुसळधार आणि अंगाच लाकूड करणारी थंडी! त्यमुळे झोप लागायची शक्यता अगदी नाहीच. मग गप्पा मारत रात्र काढली. पहाटेच बाहेर पडलो. प्रातर्विधी आटपून आम्ही बेडेकारांशी गप्पा मारत नाश्ता केला आणि सुवेळा माचीचा आनंद घेत निघालो. धुकं वाढत गेल्याने बाले किल्ला काही बघता आला नाही. आम्ही उशीर होऊ नये म्हणून परतीचा मार्ग घेतला. ह्या सहली मुळे ज्ञानेश्वर, केदार,सुमित,ऋचा, जयति असे मित्र भेटले… पुढे जानेवारीत लोहगड करायचा ठरलं. मी, केदार, ज्ञानेश्वर, सुमित सगळे लोकल पकडून मळवलीला पोहचलो. तिथून भाजेच्या सुंदर लेण्यांचा आध्यात्मिक आनंद घेऊन आम्ही 'पुल', 'अत्रे', 'कुरुंदकर' अश्या विषयांवर खल करत करत लोहगड पायथा गाठला. खाली जेवणाची व्यवस्था करून आम्ही गड फिरायला घेतला. लोमेश ऋषींच्या तपाच ठिकाण, विंचू कट, इ. हिंडून आम्ही परतीचा मार्ग घेतला.
माग्झीनसाठी श्री. श्रीनिवास खळे यांची मुंबईला वर्सोवा इथे मुलाखत घ्यायचे ठरले.
लवकरच स्नेह मेळाव्याची तयारी सुरु झाली. मधल्या काळात इतिहास मंडळाची मोठी सहल काढायचा ठरल. श्री. श्रीनंद बापट यांना मार्गदर्शक म्हणून घेऊन आम्ही २०-२५ लोक अजंठा-वेरूळ सहल करायला निघालो. दोन दिवस प्राचीन भारतीय सौंदर्य स्थळांच्या संगतीत घालवणे हा अनुभवच लाख मोलाचा होता. बापटांचा 'पाणक्या' होऊन दोन दिवस कसे गेले कळला हि नाही. पहिल्या दिवशी अजिंठा, त्या रात्री एका धर्मशाळेत मुक्काम, रात्री आकाश-निरीक्षण आणि अनिरुद्ध व तन्मय यांच्याशी शास्त्र-संवाद, दुसर्या दिवशी सकाळी कुलताबादला सम्राट औरंगझेबच्या समाधीचे दर्शन आणि वेळूर्च्या कैलास आणि इतर लेण्यांचे डोळे दिपवून टाकणारे दर्शन… परतीच्या प्रवासात श्रीनिवास, शाश्वत, हर्षद, तन्मय, केदार, अनिरुद्ध, सुमित, ऋचा, विक्रांत, ह्याच्या बरोबरीने बापट दाम्पत्यानी केलेलं गायन…अलौकिक आनंद…
वाद-विवाद मंडळाची दिवे-आगर आणि हरिहरेश्वर सहल.
इतिहास मंडळाची लोहगड सहल.
पुण्यात 'अबोली' इथे श्री. दिलीप प्रभावळकर यांच्याशी गप्पा.
वाद-विवाद मांडळाच्या अक्षय, मंदार, तन्वी, दयानंद आणि वौभव बरोबर लोहागडास सहल.
वाद-विवाद मंडळाच्या ग्रुपची आम्ही काढलेली कोकणातली कर्दॆ सहल.
इतिहास मंडळाची भीमाशंकर सहल. सोबत ओमकार, अनंत, स्मित व सुमित…
वाद-विवाद मंडळाच्या ग्रुपची तिकोना इथे सहल.
आनद बरोबर सिंहगडची खर्चिक सहल.
माग्झीनतर्फे अण्णा हजारे यांच्या राळेगण-सिद्दी आणि पोपटराव पवार यांच्या हिवरे-बाजारला भेट.
इतिहास मंडळाची ४ दिवसीय कर्नाटक मोहीम, हम्पी!मार्गात भीमसेन जोशी यांच्या जन्म गावी गदगला व तेथील मराठी मंडळाला भेट.
माग्झीने तर्फे नागपूरला श्री . मारुती चितमपल्ली यांच्याशी मनमोकळ्या गप्पा. पुढे दीक्षा भूमी, वर्धेला पवनार आश्रम, सेवाग्राम, इ. स्थळांना भेटी…मानसी, आनंत, ओंकार,मिनल,अभिषेक आणि मी.
इतिहस मंडळाची तोरणा इथे सहल. मदुरा,अनंत,केदार,सुदर्शन,केतन,गणेश आणि मी.
आनंद, जयेश आणि मी सगळे ४ दिवस कोकण दौर्यावर गेलो. गणपती-पुळे, रत्नागिरी-टिळक जन्मस्थान, रत्न-दुर्ग,थिबा पालस, सावरकर स्मारक, पावस, मालवण,सिंधूदुर्ग, कुणकेश्वर-समुद्र किनारा…
माग्झीन मुलाखतीसाठी मुंबईला श्री. शंकर महादेवनची भेट.
वाद मंडळासाठी श्री. मंगेश पाडगावकर यांच्याशी गप्पा आणि मुंबईला भेट.
वाद-विवाद मंडळाची काशीद समुद्र किनार्याला सहल.
माग्झीनची काशीदला आणि किल्ले जंजिराला महा-भयंकर सहल.
ड्रामाच्या मंडळी बरोबर गाड्यांवर सिंहगड सहल.
इतिहास मंडळ परिवारातल्या पहिल्या वहिल्या लग्नासाठी नाशिकला दौरा. अनिरुद्ध, ज्ञानेश्वर, हर्षद, केदार, अनंत, सुदर्शन,ओंकार, विक्रांत आणि मी. त्रिंबकेश्वर आणि ब्राह्मवर्ताला भेट. काशिपुरीचे दर्शन.
माग्झीनची समर्थांच्या शिवथरघळीत म्हात-सुंदर अनुभव…
सचिन आणि मी दोघे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पाहायला चिपळूणला गेलो. श्रीक्षेत्र परशुरामला भेट.
मी, आनंद , गौरव आणि संयुज : दिल्ली, देहराडून, मसुरी दौरा आणि श्री. रस्किन बॉंड यांची भेट.
इतिहास मंडळाची मुंबईच्या छत्रपती शिवाजी संग्रहालय (प्रिन्स वेल्स ) भेट...
नवनीत , सोनल , भाविका आणि मी : श्याम बेनेगल यांची मुंबई येथील हाजी आली जवळील कार्यस्थळी भेट.
इतिहास मंडळाची किल्ले रेवदंडा, समुद्र किनारा आणि खाडी रेवदंडा व किल्ले कोर्लई ह्या स्थळांना भेट.
ह्या प्रवासात अनेक वल्ली भेटले…
नॆलेमा मिश्र
अजित अभ्यंकर
भालचंद्र नेमाडे
आरूण साधू
अच्युत पालव
विश्वंभर चौधरी
कुमार केतकर
सुरेश द्वादशीवार
सुधीर गाडगीळ सुरेश द्वादशीवार
निखिल वागले
महेश एल्कुञ्चवर
गिरीश कर्नाड
नागनाथ कोतापल्ले
गुरु ठाकूर
अमृता सुभाष
अब्दुल कलम
सदानंद मोरे
विकास आमटे
शिरीष काणेकर