नमन अवघ्या या रसिक जना या....
खरं हे लिखाण लिहायचा म्हणून लिहिलेलं नाही, कधी तरी मनात अडलेला मनाला, अडवणारा असा काही विषय एका मना पासून अनेक मनांना पोहचावा आणि त्याची कधी धग असेल, कधी उर्जा असेल तर कधी आनंद ही असेल, तो सतत जाणवावा महणून हा प्रपंच...वयाच्या प्रत्येक टप्प्यावर कसे विचार मनात तरळतात आणि आपण त्यांना कसे साद देतो हे पाहण्याचा हा यज्ञसमारंभ...सामिध्या विचारांच्या... विचारांच्याच तप्त अग्नी मंडळातून अस्सल 'सुवर्णा'ला सदैव तपासणाऱ्या नव्हे अधिक प्रज्वलित करणाऱ्या...ज्याची पुण्याई सुवर्णा प्रमाणे नेहमी वृद्धिंगत होणारी...आयुष्याच्या शेवटा पर्यंत आणि नंतरही...ह्या यज्ञाला समिधा फक्त 'भटांच्या' नकोत तर अवघ्या विश्वाच्या हव्या आहेत....अर्पण व्हा..या यज्ञात.
.

Thursday, March 10, 2011

कधी  कोणी असं भेटतं आणि आयुष्याशी तात्विक संवाद होतो.....
'अभीयांता' वर्षांकासाठी आमची मराठी विभागाची मंडळी गेली होती-दिलीप प्रभावळकर यांच्याकडे.वेळ दिली होती अर्ध्या तासाची पण गप्पा रंगल्या आणि तब्बल सव्वा तास मुलाखत सुरु होती...
त्यांच्या अभिनय संबंधीच्या मतांने मी प्रचंड प्रभावित झालो.अभिनेत्याने भुमिकेमध्ये शिरायचं वगरे नसतं तर ती भूमिका तीन टप्प्यांमध्ये घडते...एक म्हणजे तुम्ही काय आहात ही जाणीव ..दुसरी तुम्ही ती करीत आहात याची जाणीव..आणि तिसरी म्हणजे प्रेक्षक म्हणून तुम्ही ती बघता ही  जाणीव.
"टिपरे ही मालिका मी ऐन उंची वर असतांना बंद केली कारण मला लोकांनी 'ती मालिका बंद का केली ?' हे विचारणं मला त्यांच्या 'ती मालिका कधी बंद करणार?'ह्या विचारण्यपेक्षा जास्त आवडतं..."अश्या गमतीदार शब्दात त्यांनी त्यांचे विचार मांडले...
  विजय तेंडूलकर 'हसवा फसवी'चा प्रयोग  बघायला आले होते.लेखन स्वतः प्राभावळकरांच होतं.त्यामुळे हे स्वतः जरा बिचकूनच होते,तेंडूलकर जे येणार होते!
प्रयोग संपला आणि तेंडूलकर प्रभावळकरांना म्हणाले  'प्रेक्षक तुमच्या बाजूने आहेत'.
                 हा माणूस जरा बिनधास  वाटला तो वागण्यामुळे नाही, बोलण्यामुळे नाही, कोणत्या हालचालीमुळे नाही तर 'स्वतः'च्या विचारांमुळे...
                                    ह्या माणसाने अभिनय संबंधी एक आत्मीयता माझ्यात निर्माण केली केवळ १ तासांच्या चर्चे मध्ये...जे क्षेत्र आपल्यासाठी नाही असं वाटत होतं ते आपलं क्षेत्र कसा आहे हे मला या माणसाने सांगितलं असं वाटतं.

Sunday, March 6, 2011

                    स्टालिनच्या राजवटीत साम्यवादाचं जे परिवर्तन स्तलीन्वादामध्ये झाला त्याला स्टालिनचीच महात्वाकांग्षा जवाबदार होती.स्टालिन ने पूर्व युरोप,कोरिया,चीन यांना आपला मित्र पक्ष म्हणून स्वतः च्या जवळ आणि भांडवलशाही देशांच्या विरुद्ध तयार केलं.पुढे आशियायी तसेच क्युबा सारखे देश स्टालिन ला येऊन भेटले आणि या पद्धतीने जगभर शीत-युद्धाचे  वातावरण तयार केले.स्टालिन जागा समोर आला तो साम्यवादाच्या आक्रमक धोरणांमुळे.दुसऱ्या विश्वयुद्धात रशियन फौजेने हिटलर ला हरविले आणि अमेरिकेच्या ताकदीचा देश म्हणून रशिया समोर आला.या आघाडीचा कारण साम्यवाद आणि तो हि अतिरेकी साम्यवाद असावा असा निष्कर्ष तत्कालीन राष्ट्रांनी काढला आणि अनेक हुकुमशहा स्टालिन च्या मदतीने साम्यवादाचा  मुखवटा घेऊन सत्ता काबीज करण्यात यशस्वी ठरले.ही हुकुमतीची विचारधारा म्हणजे स्तलीन्वाद!!
                    मग अश्याच हुकुमशाहीच्या विचारातून प्रेरणा घेण चीन मध्ये घडली ती म्हणजे 'सांस्कृतिक क्रांती'!!!
माओने आपला गुरु म्हणून स्टालिन ला पुढे केला,जो एक 'लोकशाहीवादी हुकुमशहा' होता,त्याने केलीली रशिया    प्रगती पुढे ठेवली,आणि चीन च्या प्रगतीचे आश्वासन देऊन त्याने क्रांती घडवून आणली आणि चीन चा तो सम्राट झाला...मओवादाचा उदय झाला...
     

“विसरलेला ‘उद्याचा’ इतिहास”

“ झाली जीर्ण सारी इतिहासाची पाने,

ऊच ताठ उभी,खाली झुकली माने.

जालियनवाला विसरलो घडले नंदीग्राम,

संयोग-भूत भविष्याचा,हा अजब आहे संग्राम.

दलित विसरले दलितांचे आंबेडकराजी,

म्हणून दालीतांनीच घडविले दलितांचे खैरलंजी.

विसरलो देशाचे स्वाभिमानी ऐतिहासिक सूत्र,

म्हणूनच उरले इंग्रजांचे इंग्रजी पुत्र.

येतो वारा जातो वारा सोडून जातो धूळ,

इंग्रज आले येऊन गेले पण सोडून इंग्रजी मुळ.

कोटींच्या कोटी शतके भारत जगला

सिकंदर आला,बाबर आला,गाझी-नादिर-अब्दाली आला,

अरे तरीही,जुलूम करणाऱ्या जुल्मिंचा कुळ नाही उमगला.

घाण सगळी इतिहासाची लक्षात राहिली छान,

स्वधर्म,स्वराष्ट्र,स्वाभिमान रक्षण्याचे भुललो आम्ही भान.

छत्रपती शिवरायांची काय होती शिकवण,

कोण गुरु,कोण शिक्षक यांचा वाद आम्हा पसंद,

परि इतिहास-वादंगाचे केले आम्ही कालवण,

पण ठेवा जरा शिवरायांची आठवण.

जे भुलले इतिहास,काय घडवणार ते इतिहास,

जे भुलले इतिहास,होणार त्यांचा उपहास.

अरे वेचा सारी जीर्ण इतिहासाची पने,

झुकलेली पुन्हा उभी ताठ राहतील माने.”



'अद्वैत...' 

“मनातील संवेदनांना फुटतो आज कंठ,

अलगद निघतो स्वर मधुर संथ,

कोंडून घे रे सुरांना,

बिलगून मन हे सुरेले,

गळू दे रे लळा

गोळा करितो चांदणे मी,

भेट आणली तुला

आहे सखे चांदण्याचा माळा

या मळ्याच्या पौर्णिमेला,

स्वर येतील तुझ्या ओठावरी,

साद देतील तुला स्वप्नचान्दणी,

आठवून देतील तुला माझा संवेदनांच्या बखारी,

बिलगून घे रे सुरेल त्या आठवणी,

का तू आणतेस हा दुरावा?

एकची श्वास दोघांसी पुरावा,

जीवात-जीव ऐसा सखे मुरावा,

बघ मन अपुले असे गुंतवावे,

बिलगून घे रे वेदना!

कोणाच्या ह्या संवेदना हेही न कळावे,

शरीर दोन असावे...ह्रिदय एक व्हावे...”



“एक प्रश्न जीवनाचा”

“कोणी माला सांगेल का-

माणूस जीवन जगतो का ?

पैसे कमविण्यासाठी का खर्चविण्यासाठी,

मित्र तयार करण्यासाठी का शत्रूंना मारण्यासाठी,

स्वतः जिंकण्यासाठी का दुसऱ्याला हरविण्यासाठी,

या दोन्ही तर एका नाण्याच्या दोन बाजू !

पण मुद्दा तर मागेच राहिला ना-

कोणी मला सांगेल का –

माणूस जीवन सजतो का?

जगण्यासाठी जगतो तो का जाणण्यासाठी जगतो तो,

मनासाठी जगतो तो का बुद्धीसाठी जगतो तो,

जगण्यासाठी जगतो तो का मारण्यासाठी जगतो तो,

माऊलीच्या पोटातून माऊलीच्याच कुशीत जायला जगतो का ?

कोणी माला सांगेल का-

माणूस जीवन जगतो का?

मिळाले हे जीवन आपल्याला

आहे किती हे सुंदर,

एवढे सुंदर जीवन जागून सुद्धा,

शेवटी माणूस मातीच पांघरतो ना?

कोणी मला सांगेल का-

माणूस जीवन जगतो का?”



“शब्द थोडे मनासाठी!

“मन माझे मानस सांगे मनातले गुपित,

मन रांगडे हे अज्ञ भटकते रानी-वनात,

कधी क्षमा कधी अंबर सामावते ह्या मनात,

उगवतीचा सूर्य विचारे हे सृष्टी सौंदर्य फुलले कशात?

मन माझे मानस सांगे मनातले गुपित,

पंचखंडातला हा केवडा-कस्तुरीचा हृदय-वरा,

म्हणे ‘कोणाचा हा सुगंध जरा विचारा’!

फुललेली तेल वात सांगे ‘जरा हा उजेड कोणी आवरा’!

हर्ष भरीत आनंदाने मन जाई कोणाच्या कुशीत?

मन माझे मनास सांगे मनातले गुपित,

मुकुट सोनेरी,पद कमाल चंदेरी,

अंगवस्त्र रेशमी अतिशय सोन रुपेरी,

तरी या श्रीमन्तितले ते ह्रिदय दरिद्री,

मनातला हा कृष्ण-कपत उमटे शब्द-मुठीत !

मन माझे मनास सांगे मनातले गुपित...”




“र‘हास्य’ आहार”

“प्रगतीच्या ताकला शिस्तीचे बेसन लावा,

विश्वास सुंदरतेला तेजाच्या तुपाची फोडणी घाला...

पोळीतल्या माणसा-माणसामधील दुरावा,

नष्ट करण्या त्यात प्रेमाचे गोड पुरण भरा...

वेगवेगळ्या जाती,धर्म,पंथांच्या भाज्या एकत्र करून,

एकात्मतेची फोडणी घाला आणि करा कोशिम्बीर तयार...

वामन म्हणे एकदाचे होऊनिया जाऊ दे,

कढी,पुरणपोळी आणि कोशिंबीर तयार..

म्हणजे मिळेल स्वादिष्ठ पौष्टिक आहार...