प्रवास मानाविय विचारांचा...
'मार्क्स ते माओ' - भाग १
भारतीय संस्कृती ही अनेक वैचारिक मंथनातून विकसित आणि समृद्ध होत गेली.ह्या प्रवासातून अंतरस्थ विचारांचा विचार मोठ्या प्रमाणात केला गेला.पण सामाजिक स्वास्थ्यचा जरी विचार केला गेला तरी तो विदेशी प्रयत्नात इतका सखोल आणि परिणामकारकपणे केला गेला,की माणसाच्या सामाजिक वैचारिक उन्नतीसाठी पोषक वातावरण हे विदेशात निर्माण झाले आणि त्यातून मानवीय मूल्यांच्या विकासाचा इतिहास सुरु झाला.
भारतीय समाजाने दिखील हा वचार अंगीकारण्याचा प्रयत्न केला व ते करीत आहेत.हा विचार सुप्तरुपाने समाजात रुजला तो अंधयुगात आणि त्याला अंकुर आले ते औद्योगिक क्रांतीच्या कालखंडात.त्यातून उद्योग-व्यापार जगताचा वाढलेला व्याप,व्यापारी वर्ग,मध्यमवर्ग,कामगार वर्गांचा उदय आणि मग या वर्गान्माधील अधिकारांसाठी,मानवीय हक्कांसाठी निर्मण झाले ‘मानवीय मूल्य’.
या मानवीय मूल्यांमधील एक महत्वाचा वैचारिक प्रवास म्हणजे कामगार चळवळ ते साम्यवाद ते मओवाद हा प्रवास...
कार्ल मार्क्स याने प्रत्यक्ष औद्योगिक क्रांती अनुभवली,कामगार वर्गाची भांडवलदारांकडून होणारी पिळवणूक बघितली आणि त्या अनुभवांमधून निर्माण झाली जगाला नव्या काळात घेवून जाणारी विचार धारा-‘मार्क्सवाद’.कामगारांना किती वेळ काम कराव,त्यांना स्वतःचा किती वेळ मिळावा,त्यांना वेतन किती मिळाव,कामगारांच संघटन कसं व्हावं,अश्या सर्व विचारांचा काळ म्हणजे मार्क्स-आंजेल्स पर्व! भांडवलदार राज्यासंस्थेमधून कामगारांनी आपल्या हक्कांसाठी स्वीकारलेले तत्वज्ञान ज्यामध्ये कामगारांच संघटन,भांडवलदारांकडून न्यायक हक्क,वेतन,सुट्या मिळवणे अपेक्षित आहे.जगातील कामगारांना एकत्र यायचा संदेश देणारा मार्क्सवाद हा दोन महत्वाच्या गोष्टींवर अवलंबून आहे.एक म्हणजे की जगावर भांडवलदारांचेच राज्य राहणार आहे आणि या जगात कामगारांना त्यांच्या हक्कांसाठी एकत्र याव लागेल आणि विषमतेची साखळी सतत तोडत राहत त्यांना हक्क मिळवायला लागतील.आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुप्तपणे या विचारांची मांडणीच अशी आहे की ती सूचित करते की राज्य व्यवस्थेत कामगारांच राज्य येण शक्य नाही,त्यामुळे कामगार संघटन हा एकाच उपाय अत्याचारांविरुद्ध लढण्यासाठी शिल्लक उरतो.
या कालखंडाने जगभर कामगार चळवळीची मुहूर्तमेढ रोवली आणि त्या त्या संस्कृतींनी आपल्या परीने हा विचार आत्मसात करायला सुरु केले.एका भांडवलशाही व्यवस्थेत कामगारांसाठी निर्माण झालेली तत्वप्रणाली आता एक व्यवस्था का असू नये असा विचार समोर येऊ लागला.रशिया मध्ये भांदालदार आणि सरंजामशाही होती.याच काळात झ्हारशाही विरुद्ध बंड करणारे क्रांतिकारी गट सक्रीय झाले आणि त्यांना नेतृत्व लाभलेल होत लेनिनचं! भांडवलशाही व्यवस्थेत कामगारांनी केवळ संघटन करून हक्कांसाठी लढण्यापेक्षा संघटीत कामगारांनीच कामगारांच राष्ट्र उभारायचं असा नवा भारावून टाकणारा विचार लेनिनने मांडला आणि त्या उद्देशांच्या पूर्ततेसाठी रशिया चे क्रांतिकारी झटत होते-क्रांतीसाठी!
लेनिनने प्रथम विश्वयुद्धाच्या संधीचा फायदा घेतला आणि झ्हारशाहीकडून केर्लीन्स्किनी मिळवलेली सत्ता स्वतःच्या बोल्शेविक गटाकडे आणली आणि मग कामगारांच्या राष्ट्र उभारणीचे कार्य सुरु झाले ज्यामधून अस्तित्वात आली लीनींची तत्वप्रणाली-लेनिनवाद किंवा मार्क्स-लेनिनवाद.
लेनिनवादामध्ये मार्क्सच्या तत्वांचा एका राज्य व्यवस्थेला चालवण्यासाठी वापर केला गेला,जो मार्क्सला कधीच अपेक्षित नव्हता.लेनिनने मार्क्सला जसे वापरले तसेच त्याने भांडवलशाहीमाधील काही तत्वांचा स्वीकार केला ज्याला ‘न्यू इकॉनॉमिक थेओरी’ असं म्हणतात.समाजवादाकडून हा साम्यवादाकडे जाणारा हा बदल होता.ज्यात राज्य संस्थेने कामगारांच्या समतेसाठी आणि न्यायासाठी लढणे अपेक्षित होते.त्याचबरोबर व्यापाराच्या दुष्टीने या व्यवस्थेत भांडवलदारी विचारांचा स्पर्श होता.ही व्यवस्थाच कामगारांनी निर्माण केल्यामुळे इथे कुठेही कामगारांना संघटना करायची परवानगी नव्हती.कुठल्याही व्यक्तीपेक्षा इथे पक्षाला महात्व होत कारण हा कामगारांचा पक्ष होता.एक पक्षीय व्यवस्थेची ही सुरुवात होती.मार्क्सच्या विचारांचे अस्सल प्रायोग हे साम्यवादाच्या ह्या रशियन प्रयोगशाळेत होत होते.राजकारणाच्य माध्यमातून कामगारांसाठी विचार करणारे राष्ट्र म्हाणून रशिया काम करीत होते.लेनिन,जोशेफ स्टालिन,लेओन ट्रोत्स्की,निकोलाई बुखारीन,असे कित्तेक विचारवंत याच प्रयोगातून वर येत होते.साम्यवादाच्या प्रयोगातून जे विचार मंथन घडले त्यातून साम्यवादाच्या अनेक शाखा निर्माण झाल्या ज्यांनी साम्यवादाला समृद्ध केले आणि कुठे साम्यवादाला नष्ट देखील केले.लवकरच साम्यवादाचा उद्गाता paralytic stoke ने मृत्यू पावला आणि मग पूर्वीचे विचारवंत योध्ये झाले सत्तेसाठी! साम्यवादाचा प्रवास आता स्टालिनवादकडे होत होता.स्टालिनने ‘न्यू इकॉनॉमिक थेओरी’ला अमन्य केले आणि संपूर्णपणे एक साम्यवादी राष्ट्र ज्यात भांडवलशाही विचारांचा लवलेशही नसेल अशी व्यवस्था निर्माण करायचा घाट घातला.त्यासाठी फक्त रशियाने साम्यवादी होऊन चालणार नाही तर संपूर्ण जगाला साम्यवादी व्हावं लागेल असा विचार स्टालिन आणि लेओन ट्रोत्स्की यांनी वेग–वेगळ्या पद्धतींनी मांडला.स्टालिन ला आधी रशिया साम्यवादी करायचा होता मग जगाचा विचार करायचा होता,आणि तोही संपूर्णपणे साम्यवादाने.पण लेओनला लेनिनच्या मार्गांनी तरी कमी भांडवलशाही तत्वांचा वापर करून,रशिया सकट संपूर्ण जगला एकाच वेळी साम्यवादी करायचे होते.हाच तो ट्रोत्स्कीवाद!पण स्टालिन साम्यवादी पक्षाचा नेता आणि पर्यायाने रशियाचा नेता म्हणून निवडून आला,ज्यातून रशिया ला स्वीकार करावा लागला साम्यवादाचा आणिक एक प्रयोग –स्टालिनवाद.स्टालिननी आपल्या या प्रयोगात रशियाला पार होरपळून काढल.स्टालिननी कुलक(रशियातील जमीनदार वर्ग)यांना राष्ट्राचे शत्रू ठरवल आणि त्यांना ‘घुलग’ छावण्यांनमध्ये पाठवल,त्यांची जमीन जप्त करून ती देशासाठी वापरण्यात आली.स्टालिन ने पंच वार्षिक योजना जगात सर्वात आधी सुरु केली.सैनिकीकरण,औद्योगिकीकरण अधिक प्रमाणात राबवल.स्टालिन चा काळ हा पक्षीय प्रतिमे पेक्षा स्वतः च्या म्हणजे सत्ताधारी माणसाच्या प्रतिमेकडे जास्त होता.तो व्याक्तीनिष्ट व्यवस्थेचा समर्थक पण सरंजामशाहीचा विरोधक होता,पण इतिहास सांगतो की या दोन्ही व्यावास्थांमधील रेष फार धुसर आहे आणि हा फरक स्वतः स्टालिनला पाळता आला नाही. (क्रमशः)
No comments:
Post a Comment