नमन अवघ्या या रसिक जना या....
खरं हे लिखाण लिहायचा म्हणून लिहिलेलं नाही, कधी तरी मनात अडलेला मनाला, अडवणारा असा काही विषय एका मना पासून अनेक मनांना पोहचावा आणि त्याची कधी धग असेल, कधी उर्जा असेल तर कधी आनंद ही असेल, तो सतत जाणवावा महणून हा प्रपंच...वयाच्या प्रत्येक टप्प्यावर कसे विचार मनात तरळतात आणि आपण त्यांना कसे साद देतो हे पाहण्याचा हा यज्ञसमारंभ...सामिध्या विचारांच्या... विचारांच्याच तप्त अग्नी मंडळातून अस्सल 'सुवर्णा'ला सदैव तपासणाऱ्या नव्हे अधिक प्रज्वलित करणाऱ्या...ज्याची पुण्याई सुवर्णा प्रमाणे नेहमी वृद्धिंगत होणारी...आयुष्याच्या शेवटा पर्यंत आणि नंतरही...ह्या यज्ञाला समिधा फक्त 'भटांच्या' नकोत तर अवघ्या विश्वाच्या हव्या आहेत....अर्पण व्हा..या यज्ञात.
.

Thursday, September 9, 2010

एक सुरुवात......मार्निक संवादाला .....


मनातले वैचारिक स्पंदन, मनाच्या समाधानासाठी का होईना पण जगासमोर यावी या उद्देशाने समाजासाठी आणि पर्यायाने माझ्यासाठी आवश्यक  अश्या सर्व विषयांचे मर्म आपल्या समोर मांडायला केलेला हा प्रयत्न आपल्याला भविष्यात नक्कीच आवडेल....मार्मिकतेने आपल्याशी हा संवाद बुद्धिप्रामाण्यावादी जगाला प्रगतीसाठी सहाय्य करेल अशी अपेक्षा .....   लवकरच ताज्या विषयांना हात घालू....

No comments:

Post a Comment